आम्ही उद्या कार्यक्रमाला जातोय; मधुलिका यांचा भावाला शेवटचा फोन

Gen Bipin rawat and madhulika rawat
Gen Bipin rawat and madhulika rawatPTI
Summary

हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत यांचेही निधन झाले.

तामिळनाडुत (Tamil Nadu) लष्कराच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात माजी लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्यासह १३ जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर अपघातात बिपीन रावत यांच्या पत्नी मधुलिका रावत (Madhulika Rawat) यांचेही निधन झाले. मधुलिका रावत या मूळच्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) असून शहडोल घराण्याशी त्यांचे नाते आहे. हेलिकॉप्टर दुर्घटनेची माहिती मिळताच त्यांचे लहान भाऊ यशवर्धन सिंह (Yashvardhan Singh) यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या प्रतिक्रियेवेळी झालेल्या संवादाबद्दल सांगितलं होतं. तसंच अधिकाऱ्यांनी आपल्याला लवकर विमानाने दिल्लीला येण्याचा निरोप दिल्याचंही य़शवर्धन सिंह यांनी म्हटलं होतं.

यशवर्धन यांनी बहिणीसोबत झालेल्या शेवटच्या फोन कॉलबद्दलसुद्धा माहिती दिली. ते म्हणाले की, मधुलिका यांच्याशी शेवटचा कॉल हा काल सायंकाळी झाला. तिने आम्ही खास कार्यक्रमासाठी जाणार आहे हे कळवलं पण नेमकं ठिकाण आणि कशाचा कार्यक्रम याची माहिती मात्र दिली नव्हती. हे लोक सुरक्षेच्या कारणामुळे कुठे जातात याबद्दल सांगत नाहीत. कार्यक्रमाहून किंवा बाहेरून परत आल्यानंतरच समजतं की नेमके कुणीकडे आणि कोणत्या कार्यक्रमासाठी गेले होते.

Gen Bipin rawat and madhulika rawat
मधुलिका रावत : राजकन्या ते शहीद जवानांच्या कुटुंबियांचा आधारवड

हेलिकॉप्टर अपघाताची माहिती अधिकाऱ्यांनी फोन कॉलवरून दिली होती. याबाबत सांगताना यशवर्धन सिंह म्हणाले की, तुम्ही लवकर विमानाने या असा निरोप अधिकाऱ्यांकडून कुटुंबियांना देण्यात आला. दुर्घटनेबद्दल जितकी माहिती दिली त्यावरून तरी काहीतरी गंभीर आणि दु:खद असल्याचं वाटतं अशीही भावना यशवर्धन यांनी व्यक्त केली होती.

दुर्घटनेनंतर सातत्यानं कुटुंबियांशी संपर्क करण्याचा प्रयत्न होतोय. तर दुर्घटनेबद्दल आणि रावत यांच्याबद्दल चौकशीसाठी आमचा संपर्क ज्यांच्याशी व्हायचा त्यांचाच मृत्यू झाला. मात्र आम्ही इतरांकडे चौकशी केली तेव्हा काहीच माहिती मिळू शकली नाही पण लवकर निघा असा निरोप मात्र देण्यात आला होता अशीही माहिती यशवर्धन यांनी दिली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com