UNESCO Report: 'जगभर १३.३ कोटी मुली शाळेपासून वंचित'; युनेस्कोची माहिती; लिंगसमानतेकडील वाटचाल समाधानकारक नाही

Education Gap Widens: सन १९९५ मध्ये बीजिंग जाहीरनामा आणि कृती कार्यक्रमाने याबाबत महत्त्वपूर्ण कार्यक्रम जगभर राबविला. त्यानंतर गेल्या तीन दशकांत बरीच प्रगती झाली आहे. मात्र, अद्यापही आणखी काम करण्याची आवश्यक असल्याचे ‘युनेस्को’चा नवीन डेटा सांगतो.
aser report

aseUNESCO report shows 133 million girls worldwide are still out of school, highlighting the urgent need for gender equality in education.

Sakal

Updated on

नवी दिल्ली: युनेस्कोच्या ग्लोबल एज्युकेशन मॉनिटरिंग (जीईएम) विभागाच्या माहितीनुसार, गेल्या तीन दशकांत शिक्षण क्षेत्रात लिंगसमानतेकडे जगाने वेगवान वाटचाल केली असली तरीही जगभरात अद्यापही १३.३ कोटी मुली शालेय शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे चित्र आहे. याबाबत जगभरातील विविध देशांनी सकारात्मकतेने ठोस कृती कार्यक्रम राबविण्याची गरज आहे, असेही ‘युनेस्को’ने म्हटले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com