Video : मोदींचे नाव घेताच पाक मंत्र्याला बसला झटका !

वृत्तसंस्था
Friday, 30 August 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच पाकच्या मंत्र्याला वीजेचा झटका बसला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्लीः पाकिस्तानचे मंत्री पाकिस्तानचे रेल्वे मंत्री शेख रशीद यांनी भारताला अण्वस्र हल्ल्याची धमकी दिली होती. शेख हे भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पाकिस्तान काश्मिरी जनतेसोबत आहे हे दाखवण्यासाठी पाकिस्तानमध्ये आज (शुक्रवार) 'काश्मीर अवर्स'चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रशीद हे माईक हातात घेऊन जनतेला संबोधित करत होते. त्यांनी मोदींचे नाव घेताच त्यांना वीजेचा झटका बसला. त्यामुळे ते क्षणभर गोंधळले, या घटनेचे पाकिस्तानी माध्यमांच्या कॅमेरॅत चित्रीकरण झाले.

पाकिस्तानी पत्रकार नायला इनायत यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. रशीद भारताविरोधात बोलताना म्हणाले, 'आम्ही तुमच्या मोदी धोरणांना जाणून आहोत. असे बोलत असतानाच त्यांना वीजेचा झटका बसला आणि ते क्षणभर गोंधळून गेले. त्यानंतर ते पुन्हा म्हणतात की, 'मला वाटतं माईकमधून करंट आला असेल. मात्र, मोदी हा विरोध मोडून काढू शकत नाहीत.'

दरम्यान, शेख रशीद हे लंडनध्ये गेले होते तेव्हा त्यांना अज्ञातांनी बेदम मारहाण केली होती. शिवाय, त्यांच्यावर अंडी फेकण्यात आली होती. तो व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर रशीद यांनी पाकिस्तानी वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले होते की, ऑक्टोबरमध्ये किंवा त्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये पूर्ण युद्ध होईल. तसेच आम्ही आमची हत्यारे ईद किंवा दिवाळीसाठी राखून ठेवलेली नाहीत, जर पाकिस्तानच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला तर ते भारतावर हल्ला करतील.'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: getting electric shock after pakistani minister taking pm modis name