पर्दाफाश! लोकांचे डर्टी व्हिडिओ बनवून नवरा-बायकोनं उकळले 20 कोटी

दोघांनी आपल्या टोळीत ३० महिलांना सहभागी करून घेतलं होतं.
Crime News
Crime NewsTeam eSakal
Updated on

व्यापारी आणि वरीष्ठ अधिकाऱ्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून लाखो रुपये उकळणाऱ्या एका जोडप्याला गाझीयाबाद पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. या जोडप्यानं थोडे-थोडके नाही तर वर्षभरात तब्बल एक करोडपेक्षा जास्त लुबाडणूक केली आहे. या जोडप्याने अनेकांना फोटो आणि व्हीडिओमध्ये फेरफारकरून त्या आधारे ब्लॅकमेल करून हे पैसे मिळवले.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या जोडप्याने आपल्या या रॅकेटमध्ये काम करण्यासाठी ३० महिलांना सहभागी करून घेतलं होतं. काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे यासंबंधीत तक्रार आली होती. तेव्हा पासून पोलिस या टोळीवर लक्ष ठेऊन होते. या टोळीतील एका महिलेने एका संस्थेच्या खात्यातून आपल्या खात्यात ८० लाख रुपये घेतले. त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत असताना हनीट्रॅप प्रकरण उघडकीस आलं.

Crime News
पत्नीला 2 लाखांत विकून पतीनं विकत घेतला Mobile

पोलिसांनी भादंविच्या कलम 292, 384 (खंडणी), 406 , 420 (फसवणूक) आणि 120 बी (गुन्हेगारी षड्यंत्र) हे पाचही कलम लावण्यात आले आहेत. पोलिसांच्या सूत्रांनी ThePrint ला सांगितले की, या जोडप्याने 300 लोकांकडून 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतले आहेत.

“या प्रकरणात आतापर्यंत आठ बँक खाती शोधली गेली आहेत, या खात्यांचा वापर खंडणीशी संबंधित व्यवहारांसाठी केला गेला होता. यापैकी चार खाती 4 कोटी रुपयांच्या व्यवहारांसाठी वापरली गेली होती. आम्हाला संशय आहे की एकूण व्यवहार यापेक्षा मोठा आहे.” अशी माहिती गाझियाबाद शहराचे एसपी निपुण अग्रवाल यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com