'चारित्र्यावर संशय घेतला, बदनामी केली, तुम्हाला पप्पा म्हणायलाही...'; 22 पानांची चिठ्ठी लिहून भावा-बहिणीनं संपवलं जीवन; वडील-सावत्र आईवर गंभीर आरोप
UP Crime News : घटनेदरम्यान आई घराबाहेर गेली होती. घरी परतल्यावर दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले. खिडकीतून डोकावून पाहिल्यानंतर आईला दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळले.
गाझियाबाद (उत्तर प्रदेश) : गाझियाबादमधील कविनगर परिसरात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. गुप्तचर ब्युरो (IB) मध्ये कार्यरत असलेला अधिकारी अविनाश कुमार सिंग (26) आणि त्याची बहीण अंजली सिंग (23) यांनी बंद खोलीत आत्महत्या केलीये.