UP Encounter: मित्राकडून पैसे घेण्यासाठी आला अन् सापळ्यात अडकला; सूर्या चौहान हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराचा एन्काउंटर

Main Accused Asad Killed in Police Encounter: गाझियाबादमधील सूर्या चौहान हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असद याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला. मित्राकडून पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी सापळा रचला.
UP Encounter

UP Encounter

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गाझियाबाद (Ghaziabad) जिल्ह्यातील खोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या बहुचर्चित 'सूर्या चौहान' (Surya Chauhan) हत्याकांडात अखेर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि ५० हजार रुपयांचे इनाम असलेला कुख्यात गुंड असद (Asad) याला पोलिसांनी एका थरारक चकमकीत (Encounter) ठार केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com