गाझियाबाद : नंदग्राम परिसरातील एका निवासी सोसायटीत (Ghaziabad Case) एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. घटस्फोटीत महिलेने (Divorced Woman) तिच्यावर बलात्कार केल्याचा, त्याचे व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल करत आर्थिक आणि दागिन्यांची मोठी लूट केल्याचा गंभीर आरोप केला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात आरोपीच्या पत्नीचाही सहभाग असल्याचे पीडित महिलेने सांगितले आहे.