
नवी दिल्ली-पुणे : नेटविश्वामध्ये आज ‘जिब्ली इमेज’चा अक्षरशः महापूर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. फेसबुक असो की ‘एक्स’ अथवा ‘इन्स्टा’ सगळीकडेच ‘जिब्ली आर्ट’ चर्चेचा विषय बनला होता. सामान्य नागरिकांपासून ते नेते मंडळी आणि सिनेअभिनेत्यांप्रमाणेच सर्वचजण या इमेज पुरामध्ये अक्षरशः न्हाउन निघाले. ही कमाल केली ‘ओपनएआय’च्या ‘चॅटजीपीटी-४ ओ मॉडेल’च्या इमेज जनरेटरने पण त्यामुळे कॉपीराइटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.