Congress: गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gulam Nabi Azad & Sonia Gandhi

Congress: गुलाम नबी आझाद यांनी दिला काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

गुलाम नबी आझाद यांनी जम्मू-काश्मीर काँग्रेसच्या प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांची याच दिवशी या पदावर नियुक्ती करण्यात आली होती. जम्मू-काश्मीरमधील पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या सदस्यत्वाचाही त्यांनी राजीनामा दिला आहे.

गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्याच्या कारणाबाबत स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.

पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी ही महत्त्वाची जबाबदारी 47 वर्षीय वानी आणि 73 वर्षीय ज्येष्ठ नेते आझाद यांना निवडणूक प्रचार समितीचे प्रमुख म्हणून दिली होती. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, सोनिया गांधी यांनी जम्मू आणि काश्मीर काँग्रेस समितीसाठी निवडणूक प्रचार समिती आणि राजकीय व्यवहार समिती (पीएसी) यासह सात समित्याही स्थापन केल्या होत्या.

वेणुगोपाल म्हणाले होते की, सोनियांनी गुलाम अहमद मीर यांचा प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा स्वीकारला आणि त्यांच्या जागी रसूल वानी यांची अध्यक्षपदी नियुक्ती केली. आझाद यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वानी हे राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि बानिहालचे आमदार आहेत.

आझाद हे काँग्रेसच्या जी 23 गटाचे प्रमुख सदस्य आहेत. या नव्या नियुक्त्यांमुळे काँग्रेस हायकमांड आणि आझाद यांच्यातील संबंध सुधारल्याचे मानले जात होते. आझाद यांनी 15 ऑगस्ट रोजी राहुल गांधींसोबत 'आझादी गौरव यात्रे'मध्येही भाग घेतला होता, मात्र त्याचदरम्यान त्यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताने सर्वांनाच धक्का बसला आहे.

Web Title: Ghulam Nabi Azad Resigns As Chairman Of J K Congresss Campaign Committee

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..