सहावीच्या विद्यार्थिनीचा मित्र आणि त्याचे दोन मित्र...

वृत्तसंस्था
Thursday, 5 March 2020

सहावीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आणि तिचा अल्पवयीन मित्र शेतामध्ये संमतीने शारिरीक संबंध ठेवत असताना त्याचे दोन मित्र आले आणि दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली.

गढवा (झारखंड): सहावीमध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी आणि तिचा अल्पवयीन मित्र शेतामध्ये संमतीने शारिरीक संबंध ठेवत असताना त्याचे दोन मित्र आले आणि दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना येथे घडली.

'ते' व्याही-विहीण पुन्हा एकदा पळाले...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी आणि तिचा अल्पवयीन मित्र शेतामध्ये शारिरीक संबंध ठेवत होते. यावेळी दोघे जण आले होते. दोघांना नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे दोन मित्रांनीही धमकी देत सामूहिक बलात्कार केला. यामुळे मुलीने सामूहिक बलात्कार झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी तक्रार दाखल केल्यानंतर याप्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पीडित मुलीच्या मित्रानेच त्याच्या दोन मित्रांना बोलावले होते. समीर खान, शम्मी खान व तिच्या अल्पवयीन मित्राला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी बलात्कार केल्याची कबुली दिली. सुरवातीला तपासादरम्यान पीडित मुलगी चुकीची माहिती देत होती. परंतु, तिघांना ताब्यात घेण्यात आल्यानंतर खरी माहिती पुढे आली. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.

मी, पत्नीवर खूप प्रेम करीत होतो पण...

पीडित मुलीच्या नातेवाईकांनी सांगितले की, तिच्या वडिलांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले आहे. यामुळे तिला आम्ही आमच्याकडे शिक्षणासाठी आणले आहे. इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेत असून, तिच्या मित्रांनी तिला फसवून नदीच्या कडेला असलेल्या शेतामध्ये घेऊन गेले आणि सामूहिक बलात्कार केला. याबाबत आम्ही तक्रार दाखल केली आहे.

लग्न मंडपात प्रियकराने लगावली नवरीच्या कानशिलात...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl tell false story to police for her lover at jharkhand