तू फक्त आजची रात्र थांब ना...

वृत्तसंस्था
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

दोघांचा मोठ्या-थाटामाटात विवाह पार पडला. विवाहानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनदरम्यान नवविवाहतीने सासरकडील व्यक्तींना मला प्रियकरासोबत पळून जायचे असे सांगितले. पण, कुटुंबियांनी तू फक्त आजची रात्र थांब म्हणून विनंती केली.

बक्सर (बिहार): दोघांचा मोठ्या-थाटामाटात विवाह पार पडला. विवाहानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनदरम्यान नवविवाहतीने सासरकडील व्यक्तींना मला प्रियकरासोबत पळून जायचे असे सांगितले. पण, कुटुंबियांनी तू फक्त आजची रात्र थांब म्हणून विनंती केली.

इंदू नावाच्या युवतीचा मोठ्या थाटात विवाह संपन्न झाला. विवाहानंतर सासरी आल्यानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनला दोन्ही कुटुंबियांच्या नातेवाईकांसह नागरिक उपस्थित होते. परंतु, इंदू नाराज असल्याचे कुटुंबियांना दिसत होते. विवाहाच्या गडबडीमुळे डोक दुखत असल्याचा कुटुंबियांनी अंदाज बांधला.

रिसेप्शन सुरू असताना इंदूने सासरकडील व्यक्तींना बाजूला बोलावले व आपल्या प्रेमाबद्दल माहिती दिली. प्रेमाबद्दल समजल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. रिसेप्शनमधूनच मी प्रियकरासोबत पळून जाणार असल्याचे तिने सांगितले. पण, यामुळे आमची बदनामी होईल. तू फक्त आजची रात्र थांब म्हणून कुटुंबियांनी विनवणी केली. एका बाजूला रिसेप्शन जोरात सुरू असताना दुसरीकडे नवविवाहीतेची पळून जाण्याची तयारी सुरू होती. अखेर दोन्ही कुटुंबिय एकत्र आले. सर्वांनी मिळून तिची समजूत काढली.

इंदूने ती रात्र काढली पण दुसरा दिवस उजाडल्यानंतर तिने प्रियकरासोबत पळ काढला. यामुळे सासरकडच्यांनी फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl told her love story on the night of reception at bihar

टॅग्स