Lok Sabha Election: '...तर ४०० जागा आल्यास ज्ञानवापीच्या जागी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर उभारले जाईल', मुख्यमंत्र्यांनी दिलं आश्वासन

Lok Sabha Election: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यादरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionEsakal

दिल्लीतील लोकसभेच्या 7 जागांसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपने आपली सर्व ताकद दिल्लीत लावली आहे. भाजपचे बडे नेते दिल्लीत आहेत. इतकेच नाही तर विविध राज्यांचे मुख्यमंत्री रोड शो करून आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी मते मागत आहेत. या दरम्यान आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी भाजपचे पूर्व दिल्लीतील उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या समर्थनार्थ प्रचार केला. यावेळी त्यांनी भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल असं आश्वासान दिलं आहे.

यादरम्यान मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, भाजपने ४००चा आकडा पार केल्यास मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल. ते म्हणाले की, मागील निवडणुकीत आम्ही राम मंदिर बनवायचे आहे असे सांगितले होते आणि यावेळी निवडणुकीत आम्ही तुमच्यामध्ये आलो तेव्हा राम मंदिर बांधले आहे. त्यामुळे आता विजयही मोठा झाला पाहिजे, कारण आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत. भाजप जेव्हा 400 चा आकडा पार करेल तेव्हा मथुरेत भव्य मंदिर बांधले जाईल आणि ज्ञानवापीच्या ठिकाणी बाबा विश्वनाथांचे भव्य मंदिर बांधले जाईल.

Lok Sabha Election
Loksabha Election : वाराणसीत ‘एनडीए’च्या नेत्यांचे शक्तिप्रदर्शन ; पंतप्रधान मोदींनी भरला अर्ज,आजी-माजी मुख्यमंत्र्यांची हजेरी

ते म्हणाले, "जेव्हा काँग्रेस भाजपला 400 पेक्षा जास्त जागा का हव्यात असे विचारत होती, तेव्हा मला असे वाटले की याचे उत्तर आपल्याकडे असावे. म्हणून मी म्हणालो की, आमच्याकडे 300 जागा होत्या तेव्हा आम्ही राम मंदिर बांधले. आता आम्ही मथुरेत कृष्णजन्मभूमीही बनवणार आहे आणि ज्ञानवापी मशिदीच्या जागी बाबा विश्वनाथाचे मंदिर बांधणार आहे.

Lok Sabha Election
खाणीत लिफ्ट पडल्याने 14 लोक अडकले, बचाव कार्य सुरू...7 रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल

आसामचे मुख्यमंत्री पुढे म्हणाले, "जेव्हा काँग्रेस सत्तेत होती, तेव्हा आम्हाला एक प्रकारे सांगितले होते की, काश्मीर भारतात तसेच पाकिस्तानमध्ये आहे. आमच्या संसदेत कधीही चर्चा झाली नाही की, जे काश्मीर पाकिस्तानकडे आहे ते खरे तर आमचे आहे. गेल्या 7 दिवसांपासून तेथील परिस्थिती समोर येत आहे, तिथे रोज निदर्शने होत आहेत आणि तिथले लोक भारतीय झेंडे घेऊन पाकिस्तानचा निषेध करत आहेत. ते पाहून मला वाटते की, ही तर सुरुवात आहे. मोदीजींना 400 जागा मिळाल्या तर पीओकेही भारताचा होईल. सुरुवात आधीच सुरू झाली आहे. त्यामुळे मला काँग्रेसला सांगायचे आहे की आम्हाला ४०० जागांची गरज का आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com