
नवी दिल्ली : आम आदमी पार्टीनं (AAP) दिल्ली आणि पंजाबनंतर आता गुजरातवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी अहमदाबादमधील निकोल भागात दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी जनतेला संबोधित केलं. मी गुजरात जिंकायला आलोय असं आवाहन करत भ्रष्टाचार कसा संपवायचा हे मला चांगलं माहिती आहे, त्यासाठी मला एक संधी द्या, असं आवाहनंही त्यांनी गुजरातच्या जनतेला केलं आहे. (Give me a chance I know how to end corruption Arvind Kejriwal appeal in Gujarat)
केजरीवाल म्हणाले, "राजकारण कसं करायचं हे मला माहिती नाही पण भ्रष्टाचार कसा संपवायचा हे मला चांगलं माहिती आहे. आम्ही दिल्लीतील भ्रष्टाचार संपवला आहे. आज तुम्ही दिल्लीतील कुठल्याही सरकारी कार्यालयांमध्ये गेलात तर तुम्हाला लाच देण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर भगवंत मान यांनी सरकार स्थापनेनंतर केवळ दहा दिवसातंच पंजाबमधील भ्रष्टाचार संपवला आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तर तुम्ही पंजाबमधील तुमच्या कोणत्याही मित्राला याबाबत विचारा. आज पंजाबमधेय सर्व कामं लायसन्स ऑफिस, तहसिलदार ऑफिसात केवळ दहा मिनिटांत होतात. दिल्ली आणि पंजाबमध्ये कोणीही लाच मागितली तर 'केजरीवाल आ जाएगा' आणि 'भगवंत मान आ जाएगा' असं म्हणतात. गुजरातमध्ये काय होईल?"
"आज मी कोणत्याही राजकीय पक्षाची निंदा करायला इथं आलेलो नाही. मी भाजप आणि काँग्रेसला हारवायलाही आलेलो नाही. मी गुजरात आणि गुजरातींना जिंकवण्यासाठी इथं आलोय. आपला एक संधी द्या. जर तुम्हाला आमचं पाच वर्षांतील काम आवडलं नाही तर तु्म्ही कधीही त्यांना परत बोलावू शकता", असंही केजरीवाल यावेळी म्हणाले.
संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माता खोडियार मंदिरापासून केजरीवाल यांच्या रोड शो ला सुरुवात झाली त्यानंतर बापूनगर इथं पोलिसांच्या बंदोबस्तात त्यांच्या रोड शोचा शेवट झाला. दरम्यान, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, आज तुम्ही सर्वजण तिरंगा झेंडा घेऊन आलात यावरुन हे सिद्ध झालंय की तुम्ही सर्वजण देशभक्त आहात. जर कोणी राष्ट्रद्रोही असेल तर ते आहेत जे देशभक्तांमध्ये फूट पाडतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.