Global Warming : जागतिक सरासरी तापमान वाढणार; १.५ अंश वाढीची शक्यता ७० टक्के, जागतिक हवामान संघटनेचा अंदाज
Climate Crisis News : २०२५ ते २०२९ या कालावधीत जागतिक तापमान १.५ अंश सेल्सिअसने वाढण्याची ७० टक्के शक्यता असल्याचा इशारा जागतिक हवामान संघटनेने दिला आहे. या काळात किमान एक वर्ष आतापर्यंतच्या सर्वाधिक उष्ण वर्षापेक्षा अधिक तापमानाचे असण्याची ८० टक्के शक्यता आहे.
नवी दिल्ली : जागतिक सरासरी तापमानामध्ये २०२५-२९ या कालावधीत १.५ अंश सेल्सिअस अंशांची वाढ होण्याची शक्यता ७० टक्के आहे, असा अंदाज जागतिक हवामान संघटनेच्या ताज्या अहवालामध्ये व्यक्त करण्यात आला आहे.