वनतारामध्ये जगभरातील वन्यजीव तज्ज्ञांची मांदियाळी; ३० देशांतील ९८ संस्थांचा EARAZA वार्षिक परिषदेत सहभाग

जामनगरमध्ये २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान आयोजन; भारतातील २९ प्राणिसंग्रहालयांसह वन्यजीव संवर्धन, संशोधन आणि प्राण्यांच्या देखभालीवर चर्चा
EARAZA

EARAZA

sakal

Updated on: 

जामनगर, गुजरात - वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक स्तरावर सहकार्य वाढवणे, माहितीची देवाणघेवाण करणे आणि भविष्यातील संवर्धन कार्यक्रमांची दिशा ठरवणे या उद्देशाने युरेशियन रिजनल असोसिएशन ऑफ झूज अँड अ‍ॅक्वेरियम्स (EARAZA) ची वार्षिक परिषद २०२६ जामनगर येथील वनतारा येथे आयोजित करण्यात आली आहे.

२६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान होणाऱ्या या परिषदेत ३० देशांमधील ९८ संस्था आणि भारतातील २९ प्राणिसंग्रहालयांचे प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. 'वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक भागीदारी मजबूत करणे' (Strengthening Global Partnerships for Wildlife Conservation) ही या परिषदेची संकल्पना आहे. वन्यजीव संवर्धनासाठी विविध देशांतील संस्था एकत्र येऊन ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण करत आहेत.

Loading content, please wait...