Go First : गो फर्स्ट फ्लाइट 3 दिवसांसाठी कॅन्सल; जाणून घ्या रीशेड्यूल, ट्रान्सफर अन् रिफंडची प्रक्रिया

Go First Airlines
Go First AirlinesSakal

एअरलाइन GoFirst नुकतेच दिवाळखोरी दाखल केली आहे. यामुळे कंपनी सध्या आर्थिक संकटातून जात असतानाच, कंपनीने वेबसाइटवर माहिती दिली आहे की GoFirst फ्लाइट 3, 4 आणि 5 मे रोजी रद्द करण्यात येणार आहेत.

मात्र जर तुम्ही देखील या काळात फ्लाइट्ससाठी तिकिटे बुक केली असतील, तर आम्ही तुम्हाला तिकीटावर खर्च केलेल्या पैसे कसे परत मिळवायचे किंवा तिकिटाची तारीख पुन्हा शेड्यूल किंवा ट्रान्सफर करता येईल का ते आज आपण जाणून घेणार आहोत.

एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, ज्या प्रवाशांनी या तारखांना फ्लाइट बुक केली आहे त्यांना पूर्ण परतावा मिळेल आणि लवकरच ज्या पद्धतीने तुम्ही पेमेंट केले होते त्याच माध्यमातून हा परतावा दिला जाईल. एअरलाइनने आपल्या वेबसाइटवर जाहीर केले, आम्ही कबूल करतो की फ्लाइट रद्द केल्याने तुमच्या प्रवासाच्या प्लॅन्समध्ये व्यत्यय येऊ शकतो आणि आम्ही सर्व शक्यती मदत देण्यास वचनबद्ध आहोत.

Go First Airlines
Maharashtra Politics : शरद पवारांचा राजीनामा अन् भाजपनं दिली ऑफर! चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले…

याशिवाय, एअरलाइनने https://www.flygofirst.com/ या वेबसाइटवर तपशीलवार माहिती दिली आहे. ज्यामध्ये रद्द केलेल्या फ्लाइटसाठी ग्राहक रिफंड कसा मिळवू शकतात याची माहिती देण्यात आली आहे. एअरलाइनच्या म्हणण्यानुसार, ज्या ग्राहकांनी ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटरद्वारे बुकिंग केले आहे त्यांना सोर्स अकाउंटमध्ये रिफंड मिळेल. मात्र, रिफंड न मिळाल्यास ग्राहक अधिक तपशीलांसाठी ऑनलाइन ट्रॅव्हल एग्रीगेटरशी संपर्क साधू शकतो.

तिकिटे पुन्हा शेड्युल करू किंवा ट्रान्सफर करता येतील का?

विमान कंपनीने म्हटले आहे की ते तिकीटांचे वेळापत्रक रिशेड्यूल / हस्तांतरित करू शकणार नाहीत. कंपनीने सांगितले की, सीट बुक झाल्यामुळे, तिकिटे पुढील तारखेला रिशेड्यूल करता येणार नाहीत.

Go First Airlines
'तेव्हा 'न्यू बेळगाव'चा प्रस्ताव मांडला होता'; कर्नाटक निवडणूकीपूर्वी शरद पवारांचा पुस्तकातून गौप्यस्फोट

GoFirst च्या दिवाळखोरीचे कारण काय?

गो फर्स्टने जवळजवळ अर्ध्या फ्लीटच्या ग्राउंडिंगसाठी प्रॅट आणि व्हिटनी इंजिनला दोष दिला आहे. त्याच्या दिवाळखोरी फाइलिंगमध्ये, GoFirst ने सांगितले की प्रॅट अँड व्हिटनीच्या इंटरनॅशनल एरो इंजिन्सने पुरवलेल्या फेल झालेल्या इंजिनांच्या वाढत्या संख्येमुळे, 1 मे 2023 पर्यंत GoFirst ची 25 विमाने ग्राउंड करण्यात आली आहेत. सदोष इंजिनांमुळे प्रॅट अँड व्हिटनीच्या ग्राउंड केलेल्या विमानांची टक्केवारी डिसेंबर 2019 मध्ये 7% वरून डिसेंबर 2020 मध्ये 31% वरून डिसेंबर 2022 मध्ये 50% पर्यंत वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com