
कोरोनामुळं कॉलेजमधील ऑफलाइन क्लासेसही बंद करण्यात आलेत.
अभियांत्रिकी महाविद्यालयात एकाच दिवशी तब्बल 24 विद्यार्थी पॉझिटिव्ह
गोव्यातील बिट्स पिलानी (BITS Pilani) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (BITS Pilani Engineering College) कॅम्पसमध्ये 24 अभियांत्रिकी विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह (Coronavirus) आढळले आहेत. यानंतर दक्षिण गोवा जिल्हा प्रशासनानं महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्याचे आदेश दिलेत. सध्या कॅम्पसमध्ये सुमारे 2800 विद्यार्थी आहेत.
वास्कोचे उपजिल्हाधिकारी दत्तराज देसाई यांनी सांगितलं की, गोव्यातील झुआरीनगरमधील बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये 24 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एवढंच नाही तर कॉलेजमधील ऑफलाइन क्लासेसही बंद करण्यात आलेत. तसंच सामूहिक चाचणी सुरू करण्यात आलीय.
हेही वाचा: केजरीवालांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी काय म्हणालं उच्च न्यायालय?
दरम्यान, कोणत्याही व्यक्तीला कॅम्पसमध्ये येण्यास मनाई असल्याचंही आदेशात म्हंटलंय. केवळ आपत्कालीन सेवांना परवानगी देण्यात आलीय. सर्व लोकांना मास्क घालणं बंधनकारक करण्यात आलंय. पुढील 15 दिवस फक्त ऑनलाइन वर्ग चालवण्यास सांगितलं असून यासोबतच दोन मीटरचं अंतरही राखण्यास सांगण्यात आलंय. नियमानुसार, गेल्या 2-3 दिवसांपासून चाचणी सुरू झाल्याचं कॉलेज प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. आतापर्यंत 24 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झालीय. एवढंच नाही तर आरोग्य मंत्रालयानं (Ministry of Health, Goa) कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची ओळख करून चाचणी सुरू केलीय.
Web Title: Goa 24 Students Of Bits Pilani Engineering College Test Covid Positive
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..