esakal | Goa: पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू : शहा
sakal

बोलून बातमी शोधा

अमित शहा

पुन्हा सर्जिकल स्ट्राइक करू : शहा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

फोंडा (गोवा) : काश्‍मीरमध्ये सामान्य नागरिकांवर हल्ले करण्याचे आणि घुसखोरी करण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर आणखी सर्जिकल स्ट्राइक करावे लागतील, असा कडक इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज पाकिस्तानला दिला. गोव्यातील धारबांदोडा येथे राष्ट्रीय न्यायवैद्यक विद्यापीठाच्या पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते.

अमित शहा म्हणाले, ‘‘आमच्यावरील हल्ले सहन केले जाणार नाहीत, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे सिद्ध झाले होते. हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल होते. भारताच्या सीमांचा भंग न करण्याचा स्पष्ट इशारा याद्वारे देण्यात आला होता. एकेकाळी चर्चा होत असत, पण आता त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे.’’ शस्त्रसंधीचे उल्लंघन आणि काश्मीरमधील निष्‍पाप नागरिकांची हत्या थांबवली नाही तर आम्ही सर्जिकल स्ट्राईकने त्याला उत्तर देऊ. आता आम्ही कुठलेही हल्ले सहन करणार नाही, असा इशारा त्‍यांनी पाकिस्तानला दिला.

हेही वाचा: मी लोळत जाईन, नाही तर गडगडत : उदयनराजे

न्यायवैद्यक तपासणीवर भर

सहा वर्षांपुढील शिक्षा होण्याची तरतूद असलेल्या गुन्ह्याचे प्रकरण असेल तर तपासामध्ये न्यायवैद्यक तपासणीचा समावेश करण्याची गरज आहे, असे अमित शहा म्हणाले. न्यायवैद्यक तपासणी सक्तीची करण्याचा केंद्र सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सूचित केले. न्यायवैद्यक चाचणीच्या अहवालामुळे न्यायालयात भक्कम पुरावा सादर करता येईल आणि गुन्हेगारांना शासन होण्याचे प्रमाणही वाढेल, असा विश्‍वास शहा यांनी व्यक्त केला.

सावंत हेच नेते

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्‍या कामाचे आज भरूभरून कौतुक केले. त्‍यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सावंत हेच मुख्‍यमंत्रिपदाचे उमेदवार असतील, हे स्पष्ट असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे. गोव्यात मनोहर पर्रीकर आणि लक्ष्‍मीकांत पार्सेकर यांच्‍यानंतर आता प्रमोद सावंत विकासासाठी भरीव कार्य करत आहेत. त्‍यामुळे गोव्यात पुन्‍हा भाजपचेच राज्य येईल, असा ठाम विश्‍‍वास शहा यांनी व्‍यक्त केला. दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोव्याचे भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

loading image
go to top