Goa निवडणुकीत TMC शर्यतीतही नाहीये, कशाला त्यांचा उल्लेख: केजरीवाल

Goa
Goa

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party - AAP) ) राष्ट्रीय समन्वयक अरविंज केजरीवाल (Arvind Kejriwal ) यांनी आज बुधवारी गोव्यातील पणजीमध्ये तृणमूल काँग्रेसवर (Trinamool Congress - TMC) ) निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवालांच्या मते तृणमूल काँग्रेस हा पक्ष मुळातच या शर्यतीतही नाहीये. त्यांनी येत्या विधानसभा निवडणुकीच्या (legislative assembly elections in Goa) पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय.

Goa
पाकिस्तानातील 7 हजारांहून अधिक लोकं भारतीय नागरिकत्त्वाच्या प्रतिक्षेत

केजरीवालांनी काल मंगळवारी त्यांची पहिली राजकीय सभा पणजीमध्ये आयोजित केली होती. त्या सभांमध्ये तुम्ही भाजप, (BJP) काँग्रेस आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीवर (Maharashtrawadi Gomantak Party - MGP) ) टीका केली मात्र; तृणमूलवर टीका का नाही, असा प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला. त्यावर प्रत्युत्तर देताना केजरीवालांनी म्हटलंय की, तुम्ही मीडियावालेच तृणमूल काँग्रेसला इतकं महत्त्व देताय.

माझ्यामते, तृणमूल काँग्रेसला एक टक्काही मते मिळणार नाहीयेत. ते गोव्यामध्ये गेल्या तीन महिन्यांपूर्वी आलेत. या पद्धतीने लोकशाही चालू शकत नाही. लोकशाहीमध्ये तुम्हाला कष्ट करावे लागतात. तुम्हाला जनतेत जाऊन काम करुन दाखवावं लागतं. तुम्हाला असं वाटत असेल की, तृणमूल महत्त्वाची आहे मात्र, माझ्या दृष्टीने तृणमूल काँग्रेस हा पक्ष या निवडणुकीच्या शर्यतीत देखील नाहीये.

Goa
राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

मी त्यांचा उल्लेख का करावा? ते तर शर्यतीत देखील नाहीयेत. त्यामुळेच त्यांचा सभेमध्ये उल्लेख करण्याची देखील मला गरज वाटत नसल्याचा त्यांनी निर्वाळा दिलाय. पुढे ते म्हणालेत की, या देशात 1,350 राजकीय पक्ष आहेत, मग काय मी सगळ्या पक्षांचा उल्लेख करत बसू का? असा खोचक टोलाही त्यांनी लगावला आहे.

दुसरीकडे गोव्यातील तृणमूल काँग्रेसने (Goa TMC ) आज बुधवारी ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, लोकांसाठी काम करणे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहणं यावरच आम्ही विश्वास ठेवतो. जे लोक निवडणुकीचा अंदाज लावण्यात आणि मतांची वाटणी करण्यात आतापासूनच गुंतले आहेत, ते त्यांचीच राजकीय अपरिपक्वता आणि हतबलता दाखवत आहेत. कोणाला गांभीर्याने घ्यावं, याबाबतचा निर्णय जनतेनेच घ्यावा.

“गेल्या 60 वर्षांमध्ये काँग्रेसने (Congress) 27 वर्षे राज्य केले. भाजप आणि एमजीपीने (BJP and the MGP )15 वर्षे राज्य केले. भ्रष्टाचाराशिवाय या पक्षांनी राज्यासाठी दुसरं काहीही केलेले नाही. आमची सत्ता आल्यास आम आदमी पक्ष राज्यात पहिले भ्रष्टाचारमुक्त सरकार देईल आणि ही केजरीवाल यांची गोवावासीयांना सहावी हमी आहे. केजरीवाल म्हणाले, “एक रुपयाही भ्रष्टाचारामध्ये जाऊ दिला जाणार नाही. गोव्यात भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता असेल, असं आश्वासन त्यांनी गोवेकरांना (Goa) दिलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com