
कार्निव्हल हा गंमतीदार उत्सव खूप मोठ्या प्रमाणात भारतात फक्त गोव्यातच साजरा होतो. या उत्सवाचा प्रमुख असलेला किंग मोमो पणजीमध्ये जनतेसमोर जाहीरनामा वाचून शहरात चार दिवसांचा आपला अंमल जारी करतो आणि सर्वांना आपापल्या हौस मजा पूर्ण करून घेण्याची परवानगी वा आज्ञा देतो.