अपघातानंतर बसचालकाने बस घेऊन पलायन केले असून, त्याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती जबलपूर प्रशासनाने दिली आहे.
गोकाक : कुंभ मेळाव्यानिमित्त प्रयागराज (Mahakumbh Mela Prayagraj) येथे पवित्र त्रिवेणी संगमावर स्नान करून अयोध्या, काशी व अन्य धार्मिकस्थळांचे दर्शन घेऊन गोकाककडे परतीच्या मार्गावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला पडला. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील जबलपूरजवळील (National Highway Jabalpur) पहरेवा (ता. सिहोरा, उत्तर प्रदेश) येथे त्यांच्या गाडीला झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले, तर दोघे जण जखमी झाले आहेत.