हिडकल (ता. हुक्केरी, जि. बेळगाव) येथील राजा लखमगौडा धरणातून २७ मार्चपासून नदी पात्रता दोन टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. हे पाणी सोडण्यात येत असल्याने सात दिवस घटप्रभेवरील गोकाक धबधबा प्रवाहित राहाणार आहे.
गोकाक : मुधोळ, बागलकोट, बदामी, बिळगी तालुक्यातून वाहणारी घटप्रभा नदी कोरडी पडली आहे. त्यामुळे नदी काठच्या गावातील पिण्याच्या पाण्याचे उपसा केंद्र बंद पडले आहेत. परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ही पाणीटंचाई दूर करण्यासाठी गुरुवारपासून (ता. २७) हिडकल जलाशयातून (Hidkal Dam) घटप्रभा नदी पात्रता तीन हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे शुक्रवारी (ता. २८) येथील गोकाक धबधबा (Gokak Waterfall) प्रवाहित होऊन ऐन उन्हाळ्यात येथील सृष्टीसौंदर्य खुलले आहे.