
रशियन महिला निना कुटिना गोकर्णच्या जंगलातील गुहेत दोन मुलींंसह राहत होती, पोलिसांनी त्यांना वाचवले.
निनाचा आरोप आहे की तिच्या मुलाच्या राखेसह काही मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या.
ती जंगलातील शांत आणि स्वयंपूर्ण जीवनातून आता अस्वच्छ पुनर्वसन केंद्रात हलवली गेल्याचं ती म्हणते.
Who is Nina Kutina: कर्नाटकातील गोकर्णजवळील रामतीर्थ डोंगरातील गुहेत आपल्या दोन मुलींसह राहणारी 40 वर्षीय रशियन महिला निना कुटिना यांची कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. 11 जुलै रोजी पोलिसांनी तिला आणि तिच्या दोन मुलींना - प्रेमा (6) आणि आमा (4) - यांना वाचवले. मात्र, निनाच्या मते, तिचे जंगलातील जीवन शांत, कलात्मक आणि स्वयंपूर्ण होते. आता तिला आणि तिच्या मुलींना अस्वच्छ आणि असुविधाजनक ठिकाणी ठेवण्यात आले आहे, जिथे 9 महिन्यापूर्वी मृत्यू झालेल्या तिच्या मुलाच्या राखेची चोरी झाल्याचा तिने आरोप केला आहे.