PM मोदींच्या आईच्या वजनाएवढं सोनं काशी विश्वनाथ मंदिराला दान

दक्षिण भारतातील एका भक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या वजनाईतकं सोन या मंदीराला दान केलं आहे.
Kashi Vishwanath Temple
Kashi Vishwanath TempleSakal

वाराणसी : वाराणसीतल्या काशी विश्वनाथ मंदीराची शोभा आणखीनच वाढली आहे. विश्वनाथ मंदीराच्या गाभाऱ्यातील सर्व दरवाजांना सोनं लावण्यात आलं आहे. दक्षिण भारतातील एका भक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांच्या वजनाईतकं सोन या मंदीराला दान केलं आहे. सोनं लावल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काशी विश्वेश्वराचा अभिषेक करण्याचा मान मिळाला आहे.

दक्षिणेतील एका भक्ताने आपलं नाव गुपीत ठेवण्याच्या अटीवर हे दान केलं आहे. गाभाऱ्यात ३७ किलो सोनं लावण्याचं काम पूर्ण झालं असून आता सुवर्णशिखराच्या खालील भागात आणखी २४ किलो सोनं लावण्याची योजना आहे. आता हे काम महाशिवरात्रीच्या नंतर सुरु होणार आहे.

या भक्ताने तीन महिन्यापूर्वी या मंदीराला किती सोनं लागेल याची माहीती घेतली होती. आणि आपलं नाव गुपित ठेवण्याची अट त्याने घातली होती. त्यानंतर मंदीर प्रशासनाच्या परवानगीने माप घेण्याचं काम सुरु करण्यात आलं होतं. महिन्याभराच्या तयारीनंतर शुक्रवारी मंदीराला सोनं लावण्याचं कामं सुरु करण्यात आलं होतं. रविवारी हे काम पूर्ण झालं आहे.

Kashi Vishwanath Temple
Ukraine: मुंब्र्यातील दोन विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला; पालक धास्तावले

यापूर्वी १८३५ मध्ये पंजाबचे तात्कालीन महाराजा रणजितसिंह यांनी या मंदीराच्या दोन्ही शिखरांना सुवर्णजडीत करण्याचं काम केलं होतं. त्यावेळी जवळपास २२ मन सोनं लागलं होतं.

३० तासांत १० कारागीरांनी केलं काम

मंदीर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार साधारण ३० तासांत रविवारी दुपारी एक वाजेपर्यंत गाभाऱ्याच्या आतील भागात सोनं लावण्याचं काम पूर्ण करण्यात आलं होतं. यासाठी १० कामगारांनी काम केलं. अगोदर सोन्याचे पत्रे तयार करण्यात आले होते. सोन्याचे अलंकार बनवणाऱ्या एका संस्थेने कडक सुरक्षेत या सोन्याला ट्रकमधून मंदीरापर्यंत पोहचवलं होतं.

Kashi Vishwanath Temple
'लिव्ह इन'बाबत रुढीवादी समाजाचा दृष्टीकोन बदलण्याची गरज - हायकोर्ट

अद्भुत आणि अकल्पनीय झाला बाबांचा दरबार: मोदी

मंदीरातील गाभाऱ्यातील सोनं लावण्याचं हे काम पूर्ण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिली पूजा करण्यासाठी आले होते. हे काम बघून मोदी म्हणालो की, खूप अद्भुत आणि अकल्पनीय कामं झालं असून मंदीराची वेगळीच प्रतिमा सध्या झळकत आहे.

पंतप्रधान साधारण सायंकाळी ६ वाजता मंदीरात पोहचले. त्यांनी उत्तर दरवाजातून आत प्रवेश केला आणि मंदीरातील पूजाऱ्याकडून विश्वनाथाची पूजा करवून घेतली. पंतप्रधानाने सोन्याचं हे काम बघून मंदीरीची शोभा काही पटींनी वाढली असल्याचं म्हटलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com