सोन्याला आलाय 'भाव'; दर आणखी वाढले

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

स्थानिक सराफांकडून सुरू असलेल्या दमदार खरेदीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोन्याचा भाव सलग चौथ्या दिवशी वधारून नव्या उच्चांकावर पोचला. चांदीचा भाव मात्र स्थिर असल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली.

नवी दिल्ली : स्थानिक सराफांकडून सुरू असलेल्या दमदार खरेदीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सोन्याचा भाव सलग चौथ्या दिवशी वधारून नव्या उच्चांकावर पोचला. चांदीचा भाव मात्र स्थिर असल्याची माहिती ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिली.

दिल्ली सराफा बाजारात सोन्याचा भावात प्रतिदहा ग्रॅममागे 25 रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शुद्ध व स्टॅंडर्ड सोन्याचा दर अनुक्रमे 38,995 व 38,825 रुपयांवर पोचला. 1 किलो चांदीचा भाव 45,100 रुपये असून, जागतिक पातळीवर मौल्यवान धातूंच्या भावात घसरण सुरू असताना देशांतर्गत बाजारात मात्र त्यात वृद्धी होत असल्याचे स्पष्ट झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिऔंस 1496 डॉलर; तर चांदीचा भाव प्रतिऔंस 17.11 डॉलर इतका आहे. 

मुंबईतील दर (घट) 

स्टॅंडर्ड सोने (दहा ग्रॅम) : 37,607 
शुद्ध सोने (दहा ग्रॅम) : 37,758 
चांदी (एक किलो) : 43820


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gold Rates are Still Increasing