खूशखबर ! सलग दुसऱ्या महिन्यात सिलिंडर होणार एवढ्या रुपयांनी स्वस्त

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

विनाअंशदानित सिलिंडर 62.50 रुपयांनी स्वस्त 

नवी दिल्लीः घरगुती वापराच्या विनाअंशदानित सिलिंडरच्या दरात 62.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विनाअंशदानित एलपीजी दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, ही दरकपात गुरुवारपासून अमलात आली आहे. अंशदानित सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या माहितीनुसार, विनाअंशदानित सिलिंडरसाठी ग्राहकांना आता 574 रुपये 50 पैसे मोजावे लागणार आहेत. जुलै महिन्यात हे दर 100 रुपये 50 पैशांनी घटविले होते. गेल्या दोन महिन्यात विनाअंशदानित सिलिंडरच्या दरात एकूण 163 रुपयांची कपात करण्यात आली होती. 

दरम्यान, विनाअंशदानित सिलिंडर दरात झालेल्या कपातीचा परिणाम अंशदानित सिलिंडरच्या दरावरही होणार असून, अंशदानित सिलिंडर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना आता 574.50 रुपये अदा करावे लागणार असून, जुलै महिन्यात त्यासाठी 637 रुपये द्यावे लागत होते. 

या शहरांत इतका दर 
(विनाअंशदानित 14.2 किलो) 
- दिल्ली ः 574.5 
- कोलकता ः 601 
- मुंबई ः 546.5 
- चेन्नई ः 590.5 
(आकडे रुपयांत) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Good News! LPG gas cylinder price cut