Happy Independence Day: भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त गूगलने बनलंय स्पेशल डूडल

भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्य केरळमधील नितीने स्पेशल डूडल बनवत भारतीय संस्कृतीचं प्रदर्शन केलंय.
Independence Day google special doodle
Independence Day google special doodle esakal

Independence Day: भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण करण्याच्या आनंदात सगळीकडे अमृत महोत्सव साजरा केला जातोय. याच पार्श्वभूमीवर सर्च इंजिन गुगल कंपनी स्पेशल डूडल बनवत भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या डूडलला केरळच्या नितीने बनवलंय. त्यात पंतंगींना आकाशात उडताना दाखवल्या गेलंय. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा विकासाच्या शिखरावर पोहोचलाय हे या डूडलमधून दाखवण्याचा प्रयत्न केलाय.

पतंग उडवणं भारतीय संस्कृतीचा भाग आहे

भारताच्या खास स्वातंत्र्यदिनी केरळच्या कलाकार नितीने डूडल बनवलंय. पतंग उडवणं हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे डूडलच्या माध्यमातून भारतीय संस्कृती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला गेलाय. याव्यतिरिक्त ते विश्वासाचं प्रतिक आहे. जीआयएफ (GIAF) अॅनिमेशनमुळे डूडल आणखी आकर्षक दिसतोय.

स्वातंत्र्याच्या लढाईतही पंतंगीची भूमिका महत्वाची

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वतंत्र सेनानी पंतंगीवर नारे लिहून आकाशात उडवत त्यांचा विरोध प्रदर्शित करत होते. तेव्हापासून स्वतंत्रता दिवसच नाही तर इतर आनंदाच्या दिवशीही पतंग उडवत लोक त्यांचा आनंद व्यक्त करतात.

Independence Day google special doodle
Independence Day: देशप्रेम जागवणारे ‘हे’ चित्रपट पाहिलेयत का?

स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र सेनानी आणि क्रांतिकारकांची करतात आठवण

आजपासून ७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं होतं. यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आणि अनेक क्रांतिकारकांनी आणि स्वतंत्र सेनानींनी त्यांचं सगळंकाही देशासाठी समर्पित केलं होतं. त्यामुळे या दिवशी देशातील महान क्रांतिकारकांची आठवण केली जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com