भारताला अंतराळात पोहचविणाऱ्या साराभाईंच्या वाढदिवसानिमित्त डुडल

वृत्तसंस्था
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

1969 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)ची स्थापना केली नसती, तर आज आपले संदेशवहन एकतर टपाल खात्याच्या भरवशावरच चालल्याचे दिसले असते किंवा मग परदेशी संस्थांच्या. हेच अन्य विज्ञानसंशोधन संस्थांबाबत. तेव्हा अंतराळ मोहिमांच्या खर्चाचा वगैरे आपल्याला न पेलणारा विचार न करता, या यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचेच नव्हे; तर त्यांना संशोधनासाठी सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करून दिले.

नवी दिल्ली : भारताला अंतराळात पोचविणारे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्त्रो) संस्थापक विक्रम साराभाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त आज (सोमवार) गुगलने त्यांना सलाम करत डुडल केले आहे.

1969 मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची (इस्रो)ची स्थापना केली नसती, तर आज आपले संदेशवहन एकतर टपाल खात्याच्या भरवशावरच चालल्याचे दिसले असते किंवा मग परदेशी संस्थांच्या. हेच अन्य विज्ञानसंशोधन संस्थांबाबत. तेव्हा अंतराळ मोहिमांच्या खर्चाचा वगैरे आपल्याला न पेलणारा विचार न करता, या यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचेच नव्हे; तर त्यांना संशोधनासाठी सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करून दिले. आज भारताने अंतराळ क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. नुकतेच चांद्रयान 2 चे प्रक्षेपण इस्त्रोने यशस्वीरित्या केले होते.

विक्रम साराभाई यांचा जन्म अहमदाबादमध्ये एका कापड उद्योगपतीच्या घरी 12 ऑगस्ट 1919 मध्ये झाला. महात्मा गांधींसारखे त्यांचेही कान मोठे होते, त्यामुळे त्यांच्याकडे सर्वांचे लक्ष जायचे. नंतर याच मुलाने अंतराळ क्षेत्रात मोठी क्रांती घडविली. 18 व्या वर्षी त्यांना रवींद्रनाथ टागोर यांच्या शिफारशीवर केंब्रिजमध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली. मात्र, दुसऱ्या महायुद्धानंतर ते बंगळूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये नोबेल पुरस्कार विजेते डॉ. सीव्ही रमन यांच्याकडे रिसर्च करू लागले. तेव्हाच त्यांची भेट प्रसिद्ध वैज्ञानिक होमी भाभा यांच्याशी झाली. त्यानंतर ते 15 वर्षे विविध संशोधनात सहभागी झाले. अखेर 1969 मध्ये पंडीत नेहरू आणि होमी भाभा यांनी विक्रम साराभाई यांना इस्त्रोचे प्रमुख करत जबाबदारी दिली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Google Doodle On Birth Anniversary Of Indian Space Program Pioneer Vikram Sarabhai