esakal | गूगलने जुलैमध्ये ९५ हजार ‘पोस्ट’ वगळल्या
sakal

बोलून बातमी शोधा

Google

गूगलने जुलैमध्ये ९५ हजार ‘पोस्ट’ वगळल्या

sakal_logo
By
पीटीआय

नवी दिल्ली - आघाडीची सर्च इंजिन (Search Engine) कंपनी गूगलने (Google) जुलै महिन्यांत ग्राहकांच्या तक्रारीची दखल घेत तब्बल ९५,६८० प्रकारचे मजकूर वगळल्याची माहिती आज देण्यात आली. गूगलने आज जारी केलेल्या मासिक अहवालात म्हटले की, जुलै महिन्यांत यूजरकडून विविध मजकूराबाबत ३६,९४३ तक्रारी आल्या आणि याच्या आधारावर ९५,६८० मजकूर (कंटेंट) वगळण्यात आले. गूगलच्या ग्राहकांव्यतिरिक्त स्वंचलित शोधाद्वारे आतापर्यंत ५,७६,८९२ मजकूर हटवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

अमेरिकी कंपनी गूगलने भारताला आयटी नियमातंर्गत दिली आहे. हे नियम २६ मे पासून लागू करण्यात आले आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गूगलने म्हटले की, भारतात व्यक्तिगत रूपाने वापरणाऱ्या ग्राहकांकडून ३६,९३४ तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीचा विचार करत आक्षेपार्ह मजकुराची संख्या ९५,६८० एवढी होती आणि ती आतापर्यंतची सर्वाधिक मानली जात आहे. गूगलला जून महिन्यात ३६,२६५ तक्रारी मिळाल्या होत्या आणि त्यानुसार ८३,६१३ मजकूर वगळण्यात आला. एप्रिल महिन्यांत ५९,३५० मजकूर आणि मे महिन्यात ७१,१३२ मजकूर काढून टाकण्यात आला. गूगलवरून तक्रारीच्या आधारावर अनेक श्रेणीतील मजकूर काढून टाकण्यात आले. या श्रेणीत कॉपीराइट (९४,८६२), ट्रेडमार्क (८०७) आणि न्यायालयीन आदेश (४), फसवणूक (३), बनावट (१) आदीचा समावेश होता.

loading image
go to top