

Google Maps Misguides Youths in India, Car Left Hanging Over Canal While Heading to Wedding
esakal
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एक चिंताजनक घटना घडली आहे. गुगल मॅप्सवर पूर्ण विश्वास ठेवून प्रवास करणाऱ्या दोन तरुणांची कार खोल नाल्याच्या काठावर लटकली. सुदैवाने, स्थानिक नागरिकांच्या तातडीच्या मदतीने दोघेही जखमी न होता बचावले. ही घटना शुक्रवारी रात्री बारासागर पोलीस स्टेशन हद्दीतील भगवंतखेडा गावाजवळ घडली.