

₹100 Crore Investment to Turn Naimisharanya into Key Tourism Hub
esakal
उत्तर प्रदेशातील सीतापूर जिल्ह्यातील पौराणिक आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या नैमिषारण्य धामचा आता कायापालट होणार आहे. राज्य सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, लवकरच या तीर्थस्थळाचे रूप पालटणार आहे.