UMMEED Portal : वक्फ संपत्तीची नोंद व व्यवस्थापन पारदर्शक होण्यासाठी केंद्र सरकारने ‘उम्मीद’ पोर्टल सुरू केले आहे. सहा महिन्यांत सर्व संपत्तीची नोंद अनिवार्य केली आहे.
नवी दिल्ली : वक्फ संपत्तीचे चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करण्यासह त्याची नोंद ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘उम्मीद’ नावाचे पोर्टल सुरू करण्यात आले आहे. नियमानुसार सहा महिन्यांच्या आत वक्फ संपत्तीची नोंदणी या पोर्टलवर करावी लागेल.