
नवी दिल्ली : दिवंगत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या स्मारकासाठीची प्रक्रिया सरकार स्तरावर सुरू झाली आहे. याअंतर्गत नगरविकास मंत्रालयाच्या सचिवांनी यांनी आज डॉ. सिंग यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन स्मारकासाठी संभाव्य दोन भूखंडांचा प्रस्ताव दिल्याचे नगरविकास मंत्रालयाच्या उच्चपदस्थ सुत्रांनी सांगितले.