
Agneepath : योजनेबाबतचे गैरसमज सरकारने केले दूर; वाचा सविस्तर
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेविरोधात (Agneepath Scheme) देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. बिहारपासून हरयाणापर्यंतच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. कुठे गाड्या जाळल्या तर काही ठिकाणी ट्रेनचे रूळ उखडले. अशा स्थितीत या योजनेचा लाभ तरुणांना समजावून देण्याचा सरकारचा (Government) प्रयत्न आहे. (Government removes misconceptions about Agneepath scheme)
तरुणांना पटवून देण्यासाठी सरकारने अनधिकृतपणे तथ्य पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्याचे शीर्षक ‘अग्निपथ, मिथ विरुद्ध तथ्ये’ आहे. या पत्रकाद्वारे सरकारची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. योजनेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे यात देण्यात आली आहेत. दुसरीकडे या योजनेच्या माध्यमातून तरुणांच्या भविष्याशी खेळला जाणार आहे. यामुळे लष्कराची प्रतिष्ठाही कमी होणार असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे.
उद्योजक बनू इच्छिणाऱ्यांना आर्थिक मदत आणि कर्ज दिले जाईल, असे सरकारचे म्हणणे आहे. ज्यांना पुढील शिक्षण घ्यायचे आहे त्यांना बारावी सारखे प्रमाणपत्र दिले जाईल आणि पुढील अभ्यासासाठी ब्रिजिंग कोर्स प्रदान केला जाईल. ज्यांना नोकरी हवी आहे त्यांना CAPF आणि राज्य पोलिस भरतीमध्ये प्राधान्य दिले जाईल.
अग्निपथ योजनेमुळे (Agneepath Scheme) तरुणांसाठी संधी वाढतील. आगामी काळात सध्याच्या तुलनेत तिप्पट भरती होणार आहे, असे सरकारचे म्हणणे आहे. रेजिमेंट व्यवस्थेत कोणतेही बदल केले जात नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सर्वोत्कृष्ट अग्निवीरांना सैन्यात कायम केले जाईल. त्यामुळे त्यांच्यातील संबंध वाढतील.
अग्निवीरांची संख्या सैन्यात तीन टक्के असेल
अशा अल्पमुदतीच्या योजना बहुतेक देशांमध्ये चालवल्या जात आहेत. त्यांची यापूर्वी चाचणी घेण्यात आली आहे. पहिल्या वर्षी भरती होणाऱ्या अग्निवीरांची संख्या सैन्यात तीन टक्के असेल. चार वर्षांनंतर सैन्यात कायमस्वरूपी बनवण्याआधी पुन्हा नियुक्ती होईल. त्यामुळे सैन्यात भरती होणाऱ्या लोकांची कसून चाचणी आणि प्रशिक्षण घेतले जाईल, असे सरकारने (Government) स्पष्ट केले आहे.
...तो आयुष्यभर देशाची सेवा करतो
जगभरातील बहुतेक सैन्यदल तरुणांवर अवलंबून आहेत. या योजनेद्वारे तरुण आणि अनुभवी यांच्यात ५०-५० गुणोत्तर निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल. जो युवक एकदा गणवेश परिधान करतो तो आयुष्यभर देशाची सेवा करतो. आजही सैन्यातून निवृत्त झालेले लोक देशभक्त आहेत आणि देशविरोधी संघटनांमध्ये सामील होत नाहीत, असे सरकारने अग्निवीर समाजासाठी धोकादायक ठरत असल्याच्या प्रश्नावर उत्तर दिले.