C. V. Ananda Bose : पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस मुर्शिदाबाद दौऱ्यावर
Bengal Politics : राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्यांचा दौरा करत निर्वासित छावण्यांमधील नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या विरोधाकडे दुर्लक्ष करत त्यांनी दौरा केला असून, यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालदा : पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही.आनंदबोस यांनी शुक्रवारी मुर्शिदाबाद आणि मालदा जिल्ह्याचा दौरा केला. राज्यपाल बोस यांनी मालदा येथे निर्वासित छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचीही भेट घेतली.