esakal | अखेर योगी आदित्यनाथ सरकारने प्रियांका गांधींचा तो प्रस्ताव मान्य केला
sakal

बोलून बातमी शोधा

up govt, priyanka Gandhi Vadra, Congress, BJP, Yogi Adityanath

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रवासी मजूरांना आणण्यासाठी राज्य सीमेवर तयार ठेवण्यात आलेल्या 1000 बस गाड्यांना परवानगी देण्याचा आग्रह केला होता. 

अखेर योगी आदित्यनाथ सरकारने प्रियांका गांधींचा तो प्रस्ताव मान्य केला

sakal_logo
By
वृत्तसंस्था

लखनऊ : काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी प्रवासी मजुरांसाठी काँग्रेसकडून 1000 बस उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समोर ठेवला होता. योगी सरकारने या प्रस्तावाचा स्वीकार केला आहे. तसेच एडिशनल चीफ सेक्रेट्री अवनीश अवस्थी यांनी प्रियांका गांधी यांच्या खासगी सचिवांना पत्र लिहून1000 बसा गाड्यांचे क्रमांक आणि त्यांचे चालक यांची यादी मागवली आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी वाड्रा यांनी रविवारी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रवासी मजूरांना आणण्यासाठी राज्य सीमेवर तयार ठेवण्यात आलेल्या 1000 बस गाड्यांना परवानगी देण्याचा आग्रह केला होता.

या देशाचा एकुण रुग्णांच्या संख्येत आता जगामध्ये पाचवा क्रमांक

उत्तर प्रदेशच्या औरैया जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात 24 मजूरांचा मृत्यू झाला होता. तसेच 36 मजूर यात जखमी झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर व्हीडिओच्या माध्यमातून मजूरांना परत आणण्य़ासाठी 1000 बस गाड्यांची सेवा स्वीकारण्याचा आग्रह केला होता. आदरणीय मुख्यमंत्री जी, ही वेळ राजकारण करण्याची नाही. आमच्या बस गाड्य़ा सीमेवर तयार उभ्या आहेत. हजारो मजूर आणि प्रवासी अन्न-पाण्याविणा पायी चालत येत आहेत. त्यामुळे मी तुम्हाला आग्रह करते की, आमची मदत स्वीकारा, असं आवाहन प्रियांका गांधी यांनी व्हीडिओच्या माध्यमातून उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारकडे केलं होतं.

संसर्ग रोखण्यासाठी रसायनांची फवारणी केली, पण... 

रविवारी आम्ही उत्तर प्रदेशच्या सीमेवर 1000 बस उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र, योगी सरकारने हा प्रस्ताव मान्य केला नाही. संकटात असणाऱ्या मजूरांना मदत करण्यासाठी सरकार पुढाकार घेत नाही आणि आम्ही मदत देऊ केली तर तेही घेत नाही, असा आरोप काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रभारी नेत्याने केला होता. मात्र, सोमवारी हा प्रस्ताव योगी सरकारने स्वीकारला आहे.
उत्तर प्रदेशचे मंत्री आणि प्रवक्ता सिद्धार्थ नाथ सिंह यांनी या मुद्द्यावरुन प्रियांका गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. प्रवासी मजूरांच्या मुद्द्यावरुन त्या राजकारण करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. प्रियांका उत्तर प्रदेशच्या सीमेवर बस पाठवण्याचं म्हणत आहेत. यावरुन त्यांना परिस्थितीची काहीही जाणीव नाही हेच सिद्ध होतं, असं म्हणत सिंह यांनी टीका केली आहे.
 

loading image