
सरकारकडून १० भारतीय तर ६ पाकिस्तानी युट्यूब न्यूज चॅनेल्स ब्लॉक
केंद्र सरकारने राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित एक मोठा निर्णय घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सोमवारी सांगितले की त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित चुकीची माहिती पसरवल्याबद्दाल कडक कारवाई करत 16 यूट्यूब चॅनेल्स ब्लॉक केले असल्याची माहिती दिली आहे. ज्यामध्ये 10 भारतीय आणि 6 पाकिस्तानी चॅनेलचा समावेश आहे.
ब्लॉक केलेल्या सोशल मीडिया अकाऊंटची एकूण व्ह्यूअरशिप ही 68 कोटींहून अधिक आहे. या चॅनेलचा वापर राष्ट्रीय सुरक्षा, भारताचे परराष्ट्र संबंध, देशातील जातीय सलोखा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित विषयांवर सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी करण्यात आल्याचे आढळून आले. कोणत्याही डिजिटल न्यूज पब्लिशर्सनी आयटी कायदा 2021 च्या नियम 18 अंतर्गत आवश्यक असलेली माहिती दिली नाही, असे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सांगितले आहे.
Web Title: Govt Blocks 16 Youtube Channels Including 6 Pak Based For Spreading Disinformation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..