Crop Support Price : लवकर आलेल्या पावसाने शेतकरी सुखावले असतानाच केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी १४ पिकांच्या एमएसपीत वाढ जाहीर केली आहे. किसान क्रेडिट कार्डावरील कर्जासाठी व्याज सवलतीला मुदतवाढ मिळाली असून वर्धा-बल्लारशा दरम्यान चौथा रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे.
नवी दिल्ली : यंदा वेळेआधी धडकलेल्या मॉन्सूनमुळे शिवार चिंब झाले असतानाच आज ‘एमएसपी’ वाढीच्या रूपाने बळिराजावर सवलतीची सर पडली. केंद्र सरकारने २०२५-२६ या वर्षासाठी चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत मूल्यामध्ये (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.