esakal | दिलासादायक: देशात लवकरच 'रेमडेसिव्हीर'चं दुप्पट उत्पादन; किंमतही होणार कमी
sakal

बोलून बातमी शोधा

दिलासादायक: देशात लवकरच 'रेमडेसिव्हीर'चं दुप्पट उत्पादन; किंमतही होणार कमी

दिलासादायक: देशात लवकरच 'रेमडेसिव्हीर'चं दुप्पट उत्पादन; किंमतही होणार कमी

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या हाहाकारामुळे चिंतेचं वातावरण आहे. गेल्या तीन दिवसांपासून देशात तब्बल 2 लाखांहून अधिक रुग्ण आढळत असून काल एका दिवसात देशात 2.60 लाख रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात ऑक्सिजन बेड्स आणि रेमडेसिव्हीरचे इंजेक्शन या दोन गोष्टी मिळवण्यासाठी मोठे कष्ट नागरिकांना झेलावे लागत आहेत. या दोन्ही गोष्टींच्या तुटवड्यांमुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. या दरम्यानच आता थोडी दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. केंद्रीय रसायन व खत राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलंय की सरकार रेमडेसिव्हिर इंजेक्शचे उत्पादनाला वाढवण्याबाबत तसेच त्याच्या किंमतींमध्ये घट करण्यावर सध्या काम करत आहे. त्यांनी म्हटलं की, प्रत्येक दिवशी रेमडेसिव्हिरच्या 1.5 लाख इंजेक्शनचं उत्पादन सुरु आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, पुढील 15 दिवसांमध्ये रेमडेसिव्हिरचे एकूण तीन लाख इंजेक्शन प्रतिदिन तयार केले जातील. सध्या असणाऱ्या 20 प्रोडक्शन प्लांडशिवाय आणखी 20 प्लांट्सना आता परवानगी दिली गेली आहे. रेमडेसिव्हीरची किंमत कमी करण्यासाठी देखील सगळ्या कंपन्यांसोबत चर्चा केली गेली आहे. त्यानंतर सगळ्या कंपन्यांनी आपली रिटेल किंमत जी 5 हजार अथवा त्याहून अधिक होती, तिला कमी करत 3,500 रुपये अथवा त्याहून कमी केली आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

देशात कोरोना संक्रमणाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्राने मोठा निर्णय घेत रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या किंमतींमध्ये मोठी घट करण्याची घोषणा केली आहे. कंपन्यांनी या इंजेक्शनचे भाव 70 टक्क्यांपर्यंत कमी केले आहेत. याआधी सरकारने इंजेक्शनच्या वाढत्या मागणीकडे पाहता रेमडेसिव्हीर इंजेक्शनच्या उत्पादनाला वाढवण्याचा निर्णय घेतला होता.

याबाबत केंद्रीय राज्यमंत्री मनसुख मांडविया यांनी ट्विटरवर म्हटलंय की, सरकारने हस्तक्षेप करुन रेमडेसिव्हीरचे भाव कमी केले आहेत. मी औषध कंपन्यांचा आभारी आहे की त्यांनी कोविड 19 महासंकटाचा सामना करण्यामध्ये सरकारला साथ दिली. National Pharmaceutical Pricing Authority अर्थात NPPA कडून जाहीर केलेल्या विवरणानुसार कॅडीलाने रेमडॅक रेमडैक (रेमडेसिवीर 100 मिग्रा) इंजेक्शनचा भाव 2,800 रुपयांनी कमी करुन 899 रुपये केले आहेत. तसेच सिंजीन इंटरनॅशनलने रेमविन औषधाचा भाव 3950 रुपयांनी कमी करुन 2,450 रुपये प्रति युनिट केलं आहे. हैद्राबादची डॉ. रेड्डीज लॅब या औषधाला रेडीक्स नावाने विकते. त्यांनी याचा भाव 5,400 रुपयांनी कमी करुन आता 2,700 रुपये केलं आहे. त्याचप्रमाणे सिप्लाचे औषध सिप्रेमी आता 3 हजार रुपयांचं झालं आहे, जे आधी 4 हजार रुपयांना होतं.

loading image