
Delhi Face Mask : दिल्लीत पुन्हा मास्क सक्ती; नियम मोडणाऱ्यांवर होणार कारवाई
Face Mask Mandatory In Dalhi : देशासह दिल्लीमध्ये वाढत्या कोरोना रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मास्क सक्ती करण्याचा निर्णय केजरीवाल सरकारने घेतला आला आहे. सार्वजनिक ठिकाणी ही मास्क सक्ती असणार असून, नियम मोडणाऱ्यांवर 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार खासगी चारचाकी वाहनातून प्रवास करणाऱ्यांना मास्क अनिवार्य नसणार आहे.
जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, सर्व सार्वजनिक ठिकाणी फेस मास्क घालणे अनिवार्य असणारअसून, मास्क न घालणाऱ्यावर 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. या सक्तीतून खासगी चारचाकी वाहना चालकांना आणि त्यातून प्रवास करणाऱ्यांना सूट देण्यात आली असून, खासगी वाहनामध्ये मास्क घालणे अद्यापही ऐच्छिक असणार आहे. मास्क सक्ती नियमाचे काटेकोरपणे पालन व्हावे यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत.
दिल्लीत कोविड-19 मुळे मृतांची संख्या 26,351 इतकी झाली असून, राष्ट्रीय राजधानीत गेल्या एका आठवड्यात कोरोनाच्या नव्या दैनंदिन रूग्णसंख्येमध्ये वाढ नोंदवण्यात आली असून, कोरानामुळे मृतांच्या संख्येतही वाढ होत आहे. या सर्व बाबी लक्षात घेत सावधगिरीचा उपाय म्हणून दिल्लीत पुन्हा एकदा सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.