National Creators Award 2024 : सरकारने जाहीर केले 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्ड'; अर्ज कोण करू शकतात? जाणून घ्या सर्वकाही

National Creators Award 2024 : भारत सरकारने इन्फ्लुएन्सर्स, डिजीटल क्रिएटर्स आणि डिजीटल क्रिएटर्स अर्थव्यवस्था सेलिब्रेट करण्यासाठी 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची घोषणा' केली आहे.
Creators Award
Creators Award

National Creators Award 2024 : सोशल मीडियावर कंटेंट बनवणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारत सरकारने इन्फ्लुएन्सर्स, डिजीटल क्रिएटर्स आणि डिजीटल क्रिएटर्स अर्थव्यवस्था सेलिब्रेट करण्यासाठी 'नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डची घोषणा' केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने या पुरस्कारांचा उद्देश हा सकारात्मक सामाजिक बदलांना सक्रियपणे प्रोत्साहन देणाऱ्या आणि डिजिटल क्षेत्रात नाविन्य आणि सर्जनशीलतेला चालना देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे हा असल्याचे म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाचा पुरस्कार केला आहे. एका मंत्र्याने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने क्रिएटर्स इकोनॉमीची बदल घडवून आणण्याची ताकद आणि प्राभाव मान्य करत आले आहेत. यानुसार MyGov India कडून देशातील डिजीटल क्षेत्रातील डिजिटल इनोव्हेटर्स आणि कंटेट क्रिएटर्सना प्रोत्साहन देत नॅशनल क्रिएटर्स अवार्ड सुरू करण्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे पुरस्कार कलात्मकता आणि नाविन्यता दाखवून देणाऱ्या २०हून अधिक श्रेणींमध्ये देण्यात येणार आहेत. यामध्ये कथाकथन, सामाजिक परिवर्तनाचे महत्व पटवून देणे, पर्यावरणीय स्थिरता, शिक्षण, गेमिंग आणि इतरही अनेक गोष्टींचा समावेश असणार आहे. स्वतः पंतप्रधान मोदी यांनी देखील यासंबंधी एक पोस्ट कर क्रिएटर्सना नॉमिनेशन दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

Creators Award
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यामागची ही आहेत 5 कारणं; 'वंचित'ची एन्ट्री अन् मोदी-शाहांची गरज...

या पुरस्कारांमध्ये 'डिस्प्टर ऑफ द इयर' हा पुरस्कार अशा क्रिएटरला जिला जाईल ज्याने तयांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल किंवा नावीन्य आणून तेव्हाच्या परिस्थितीला आव्हान दिले आहे.

तसेच 'सेलिब्रिटी क्रिएटर ऑफ द इयर' याद्वारे एका अशा एका हाय-प्रोफाइल क्रिएटरचा सन्मान केला जाईल, ज्याने सकारात्मक बदल घडवण्यासाठी तसेच सर्जनशील आणि प्रभावशाली ऑनलाइन कंटेटकरिता एक उदाहरण सेट करण्यासाठी सेलिब्रिटी असण्याचा चांगला उपयोग केला आहे.

तसेच 'इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड' च्या माध्यमातून भारताची संस्कृती आणि सॉफ्ट पॉवर वाढवण्यासाठी मदत करणाऱ्या परदेशातील क्रिएटर्सना सन्मानित करण्यात येईल. 'टेक क्रिएटर अवॉर्ड' हा अशा क्रिएटर्ससाठी असेल जे लेटेस्ट गॅझेट्स आणि नवकल्पनांची माहिती, त्यांची समीक्षा आणि इतरांसाठी शिफारसी देतील.

Creators Award
Sagarika Ghose On Rajya Sabha : राजकारणात जाणार नाही म्हणाणाऱ्या सागरिका घोष तृणमूलमध्ये; राज्यसभेचं मिळालं तिकीट

या २० श्रेणींसाठी दिले जाणार पुरस्कार

ग्रीन चॅम्पियन अवॉर्ड, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, बेस्ट क्रिएटर फॉर सोशल चेंज, मोस्ट इम्पॅक्टफुल अॅग्री क्रिएटर, कल्चरल अॅम्बेसिडर ऑफ द इयर, इंटरनॅशनल क्रिएटर अवॉर्ड, बेस्ट ट्रॅव्हल क्रिएटर अवॉर्ड, स्वच्छता अॅम्बेसिडर अवॉर्ड. न्यू इंडिया चॅम्पियन अवॉर्ड, टेक क्रिएटर अवॉर्ड, हेरिटेज फॅशन आयकॉन अवॉर्ड, मोस्ट क्रिएटीव्ह क्रिएटर (मेल आणि फिमेल) अवॉर्ड, बेस्ट क्रिएटर फूड कॅटेगरी, बेस्ट क्रिएटर एज्युकेशन कॅटगरी, बेस्ट क्रिएटर गेमिंग कॅटेगरी, बेस्ट मायक्रो क्रिएटर, बेस्ट हेल्थ अँड फिटनेस क्रिएटर अशा विवीध २० श्रेणींमध्ये हे पुरस्कार दिले जाणार आहेत.

निवड प्रक्रिया कशी असेल?

या पुरस्कारांसाठी नामांकण करणे, नामांकणांची स्क्रिनिंग त्यानंतर सार्वजनिक मतदान आणि ज्यूरी यांच्याकडून नामांकणाची समिक्षा केली जाईल. विजेत्यांची घोषणा ज्यूरी आणि जनता यांच्या मतांच्या अधारावर केली जाईल. मंत्रालयाने सांगितले की, नॅशनल क्रिएटर्स अवॉर्डचा उद्देश सर्वसमावेशकता, सहभाग आणि सशक्त समाजाची निर्मीतीमध्ये डिजीटल मीडियाच्या क्षमतांना प्रोत्साहन देणे, त्यांचा शोध घेणे आणि त्या सेलिब्रेट करणे हा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com