
आता कुतुबमिनार परीसरात खोदकाम होणार? केंद्रीय मंत्र्यांनी दिलं उत्तर
नवी दिल्ली : सध्या ज्ञानवापी मशिदीचा मुद्दा देशात गाजत आहे, वाराणसीतील या मशीद वादाच्या पार्श्वभूमीवर आता कुतुबमिनार परिसराचे खोदकाम होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला याबाबत सूचना दिल्या आहेत. मात्र, केंद्रीय मंत्री जीके रेड्डी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे , सरकारकडून असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही अशी माहिती केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जीके रेड्डी यांनी दिली आहे. कुतुबमिनार परिसरात उत्खननासोबतच मूर्तींची आइकनोग्राफी करावी, असे सांस्कृतिक मंत्रालयाचे म्हणणे आहे, असे काही मिडीया रिपोर्टमध्ये सांगण्यात आल्याचे म्हटले होते. या उत्खननानंतर ASI कडून सांस्कृतिक मंत्रालयाला अहवाल सादर केला जाईल. सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांच्या कुतुबमिनार संकुलाच्या पाहणीनंतर केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ही सूचना दिल्याचे सांगण्यात आले.
पर्यटन सचिवांनी कुतुबमिनार पाहणी केली
कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, सांस्कृतिक सचिव गोविंद मोहन यांनी 21 मे रोजी 12 जणांच्या पथकासह परिसराला भेट दिली. या टीममध्ये इतिहासकार, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी तसेच संशोधकांचा समावेश होता. कुतुबमिनार परिसरात उत्खननाबाबत एएसआयचे अधिकारी सांगतात की, 1991 नंतर येथे कोणतेही उत्खनन झालेले नाही. मशिदीपासून मिनारच्या दक्षिणेला 15 मीटर अंतरावर उत्खनन सुरू केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले आहे.
हेही वाचा: मधू इथे, चंद्र तिथे! 'भावनिक' झालेल्या राणा दाम्पत्याला राज ठाकरेंचा टोला
वाद काय आहे?
एएसआयचे माजी प्रादेशिक संचालक धरमवीर शर्मा यांनी दावा केला की, कुतुब मिनार कुतुब-अल-दीन ऐबकने बांधले नव्हते तर राजा विक्रमादित्यने बांधले होते. ही वेधशाळा असल्याचा दावाही करण्यात आला. तत्पूर्वी, विश्व हिंदू परिषदेचे (व्हीएचपी) प्रवक्ते विनोद बन्सल यांनी कुतुबमिनार खरोखरच 'विष्णूस्तंभ' असल्याचा दावा केला होता. 27 हिंदू-जैन मंदिरे पाडल्यानंतर मिळालेल्या साहित्यातून ही इमारत तयार करण्यात आली आहे, असा दावा केला जात आहे. त्यानंतर या वादाला सुरूवात झाली.
हेही वाचा: मधू इथे, चंद्र तिथे! 'भावनिक' झालेल्या राणा दाम्पत्याला राज ठाकरेंचा टोला
Web Title: Govt Orders Asi To Conduct Of Qutub Minar Complex Excavation Amid Gyanvapi Row
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..