नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार
नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार

नवीन विषाणूबाबत सरकार सावध : डॉ. पवार

नवी दिल्ली : ओमिक्रॉनचा संसर्ग झालेले रुग्ण सापडले असले, तरी गोंधळून जाण्याची गरज नाही. केंद्र सरकार नवीन विषाणूबाबत सजग आहे आणि राज्यांना देखील परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहण्याची सूचना केली आहे, असे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी स्पष्ट केले.

दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा लहान मुलांना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असले, तरी जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉनचा धोका कोणत्या वयोगटासाठी अधिक आहे निश्चित केले नाही. तरीही दुसऱ्या लाटेदरम्यान देशात लहान मुलांवरील उपचाराची यंत्रणा उभी करण्याची तयारी सुरू केली होती. तसेच राज्यांना त्यासाठी निधी व औषधेही पुरविण्यात आली आहे, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी केली.

लोकसभेत देशातील कोरोना स्थिती आणि संभाव्य तिसरी लाट याविषयी सुमारे बारा तास चर्चा झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ने डॉ. पवार यांच्याशी संवाद साधला. देशातील कोरोनाची स्थिती आटोक्यात आहे. ओमिक्रॉनचा अधिक संसर्ग झालेल्या देशांतून येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. हा विषाणू येण्यापूर्वी केंद्र सरकारने सुमारे २३ हजार कोटी रुपयांचा कृती आराखडा तयार केला. ऑक्सिजन प्लॅंट, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड आणि औषधांसाठी या कृती आराखड्यातून निधी राज्यांना देण्यात आला आहे. महाराष्ट्रालाही ही मदत पोचली आणि हे काम लवकर पूर्ण करा, यासाठी आम्ही राज्यांकडे तगादा लावला आहे, असे डॉ. पवार यांनी सांगितले.

जागतिक आरोग्य संघटनेने ओमिक्रॉन हा विषाणू कोणत्या वयोगटासाठी घातक आहे, हे अद्याप स्पष्ट केलेले नाही. मात्र केंद्र सरकार लहान मुले आणि सहव्याधी असलेल्या ४० वयोगटापुढील नागरिकांबाबत सजग आहे. बुस्टर डोसबाबत अन्य देशात काय स्थिती आहे, याचाही विचार केला जातो. त्यामुळे यासंदर्भात तज्ज्ञांकडून शिफारस आली, तर केंद्र सरकार त्याबाबत निश्चित विचार करील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Govt Wary Of New Virus Omiron Health Minister Bharati Pawar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..