esakal | अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर
sakal

बोलून बातमी शोधा

ram temple.jpg

राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर निमंत्रण पत्रिका समोर आली आहे.

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली- राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह  तिघांची नावे आहेत. शिवाय व्यासपीठावर केवळ पाच व्यक्ती असणार आहेत. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नित्या गोपालदास यांचा समावेश आहे. निमंत्रण पत्रिकेवर राम लल्लाचा फोटोही असणार आहे. 

मोदी अयोध्येत सर्वात आधी करणार हनुमानाची पूजा; जाणून घ्या कारण

रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादातील बाबरी मशिदीचे पक्षकार इकबाल अन्सारी यांना पहिले निमंत्रण दिले गेले असल्याची माहिती एएनआयने दिली आहे. राम मंदिर भूमिपूजनासाठी एकूण 150 जणांना निमंत्रण देण्यात आले आहे. देशात कोरोना महामारीने थैमान घातले असताना गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम जन्मभूमी येथे पहिली विट रचून बांधकामाला सुरुवात होणार आहे.  मोदी 40 किलो चांदीची विट रचून भूमिपूजन करण्याची शक्यता आहे. 

गेल्या अनेक वर्षाच्या वादानंतर राम मंदिराचे निर्माण कार्य सुरु होणार आहे. 2.77 एकर जमिनीवर भव्य असे राम मंदिर बांधले जाणार आहे. 16 व्या शतकात बांधलेली बाबरी मश्चिद 1992 साली  काही हिंदू कार्यकर्त्यांनी पाडली होती. भगवान राम यांनी याठिकाणी जन्म घेतला असून याठिकाणी पुरातन काळात राम मंदिर होते असा दावा करण्यात आला होता. नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत विवादित जागा हिंदू पक्षकारांना राम मंदिर बांधण्यासाठी दिली आहे, तर त्याबदल्यात अयोध्या परिसरात 5 एकर जागा मुस्लिम पक्षकारांना दिली आहे. 

राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना; काँग्रेस नेत्याची मोदींना...

राम मंदिर सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत जय्यत तयारी करण्यात आली आहे. अयोध्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय अयोध्येत बाहेरच्या लोकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. राम मंदिर आंदोलनातील महत्वाचे चेहरे एलके अडवाणी, मुरली मनोहर जोशी आणि उभा भारती या भव्य अशा कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अडवाणी आणि जोशी दोघेही  व्हिडिओ परिषदेच्या माध्यमातून सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. उमा भारती यांनी पंतप्रधान मोदी आणि इतर निमंत्रितांच्या सुरक्षेसाठी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, सोहळा संपल्यानंतर त्या अयोध्येत येणार आहेत.  

दरम्यान,  पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्येत जाणार आहेत. नरेंद्र मोदी या धार्मिक सोहळ्याची सुरुवात हनुमान गढी मंदिरातील पूजेने करणार आहेत. हनुमानाशिवाय भगवान रामाचे कोणतेही काम सुरु होत नाही, त्यामुळे मोदी अगोदर हनुमानगढी मंदिरात जावून हनुमानाची पूजा करणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री हनुमानगढी येथे विशेष पूजा करतील.

(edited by-kartik pujari)