esakal | Hyderabad Election : टीआरएस-भाजपामध्ये चुरशीची लढत; AIMIM ला तिसऱ्या स्थानी ढकललं
sakal

बोलून बातमी शोधा

GHMC

भाजपाने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावत जोर लावला होता. त्याचा भाजपला फायदा होताना दिसतोय.

Hyderabad Election : टीआरएस-भाजपामध्ये चुरशीची लढत; AIMIM ला तिसऱ्या स्थानी ढकललं

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हैद्राबाद : ओवैसी यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या हैद्राबादमध्ये भाजपाने आघाडी घेतलेली दिसून येत आहे. ग्रेटर हैद्राबाद नगर निगम निवडणुकीच्या 150 जागांवर सध्या मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीतील आकडेवारीनुसार, सुरूवातीला आलेल्या कलांमध्ये भाजपानं 87 जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजपा पिछाडीवर गेलेले आहे. सध्या टीआरएस हा पक्ष आघाडीवर आहे. टीआरएसननं 65 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपा सध्या 41 जागांवर पुढे आहे. तर असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम ३२ जागांवर आघाडीवर आहे. भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

मात्र, AIMIM या पक्षाहून भाजपाने मुसंडी मारली  आहे. सध्या भाजप AIMIM हून अधिक जागांवर पुढे आहे. तर सत्ताधारी पक्ष टीआरएस प्रथम क्रमांकावर पुढे आहे. हैद्राबादमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असणारा ओवैसी यांचा पक्ष सध्या 32 जागांवरील आघाडीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. भाजपाने या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावत जोर लावला होता. त्याचा भाजपला फायदा होताना दिसतोय. 2016 मधील निवडणुकीत भाजपच्या युतीला फक्त 5 जागा मिळाल्या  होत्या. 

या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोरदार ताकद लावली होती. मात्र, भाजपने ही निवडणूक अगदी मोठी निवडणूक असल्याप्रमाणे तगडे खेळाडू मैदानात उतरवले होते. तेजस्वी सूर्या, स्मृती इराणी या आक्रमक नेत्यांचा तसंच प्रकाश जावडेकर, देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हैदराबादचा दौरा केला होता. गृहमंत्री अमित शहा, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा तसेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मोठ्या नेते या प्रचारसभेत उतरले होते. मात्र, या निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे दुपारपर्यंत स्पष्ट होईल. 

loading image