
Viral Video: ग्रेटर नोएडाच्या नॉलेज पार्क-3 परिसरातील अन्नपूर्णा गर्ल्स हॉस्टेलमध्ये गुरुवारी संध्याकाळी भीषण आग लागली. या दुर्घटनेने हॉस्टेलमधील 160 हून अधिक विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले. आग लागण्याचे मुख्य कारण एसीचा स्फोट असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.