Green Army: खुरपे चालवणाऱ्या हातांत आता रायफल; वाराणसीच्या ग्रामीण महिलांची ‘पिस्टलवाली सून’ म्हणून ओळख, मोदींकडूनही कौतुक

Women Rifle Shooting Training : वाराणसीतील देउरा गावातील सुमारे ४०० ग्रामीण महिला ग्रीन आर्मीच्या माध्यमातून रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. ४५ ते ६० वयोगटातील महिलांचा हा उपक्रम आत्मविश्वास, आत्मरक्षण आणि क्रीडा क्षेत्रातील नव्या संधी निर्माण करत आहे.
Rural Women in Varanasi Practising Rifle Shooting Under the Green Army Initiative

Rural Women in Varanasi Practising Rifle Shooting Under the Green Army Initiative

esakal

Updated on: 

वाराणसी ; शेतात विळा आणि खुरपे चालवणाऱ्या, घरात घुंघट घेऊन वावरणाऱ्या वाराणसीतील ग्रामीण महिला आता रायफल शूटिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. रोहनिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देउरा गावात ‘ग्रीन आर्मी’च्या माध्यमातून सुमारे ४०० महिला मोफत नेमबाजीचे धडे गिरवत आहेत. त्यांच्या या नव्या ओळखीमुळे त्यांना ‘पिस्टलवाली सून’ असे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या महिलांच्या उपक्रमाचे कौतुक केले आहे.

या महिलांमध्ये प्रामुख्याने ४५ ते ६० वयोगटातील गृहिणींचा समावेश आहे. घरातील कामे आटोपल्यानंतर त्या दररोज शूटिंग रेंजवर सरावासाठी जातात. यातील निवडक २० महिलांना वाराणसी शहरातील शूटिंग रेंजवर व्यावसायिक खेळाडूंप्रमाणे विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांसह खासदार क्रीडा स्पर्धांमध्ये पदके जिंकण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.

Loading content, please wait...