Diwali Festival Green Crackers
Diwali Festival Green Crackersesakal

Diwali Festival : दिवाळीत फक्त हिरवे फटाकेच फोडण्यास परवानगी; सरकारकडून सक्त सूचना, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू

राज्यात ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण (Diwali Festival) साजरा करण्यात येणार आहे.
Published on
Summary

फटाक्यांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निर्देश दिले असून, अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर गांभीर्याने तपासणी करावी.

बंगळूर : दिव्यांचा सण दीपावली जवळ येत असताना, कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ (Karnataka State Pollution Control Board) पर्यावरण आणि ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी कठोर नियम लागू कले आहेत. रात्री ८ ते १० या वेळेत हिरवे फटाकेच (Green Crackers) वाजवावेत, अशा सक्त सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यात ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी सण (Diwali Festival) साजरा करण्यात येणार असून, सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्या आहेत. त्यानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके वाजवता येतील आणि फक्त हिरवे फटाके लावावेत.

Diwali Festival Green Crackers
मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेस पक्षात मोठी खळबळ; सरकार कोसळण्याची शक्यता, उलट-सुलट चर्चांना उधाण

फटाक्यांच्या वापरावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अनेक निर्देश दिले असून, अधिकाऱ्यांनी फटाक्यांच्या विक्रीवर गांभीर्याने तपासणी करावी. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांनी हिरव्या फटाक्यांव्यतिरिक्त इतर फटाके विकत असल्यास संपूर्ण गोदाम सील करण्यात यावे. संबंधित व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. हिरवे फटाके क्यूआर कोड चिन्ह नसलेले फटाके जप्त करावेत. उत्सवात फक्त हिरवे फटाके वापरावेत. पशू, पक्षी, लहान मुले, वृद्ध यांना त्रास न होता त्यांचा वापर करावा. पाच ते २० नोव्हेंबर या कालावधीत सतत वायू प्रदूषण चाचणी करावी.

Diwali Festival Green Crackers
Karnataka Government : 'कावेरी'चा कर्नाटकाला पुन्हा धक्का; तमिळनाडूला पाणी सोडण्याचे सरकारला दिले आदेश

सर्व जिल्हा केंद्रांची मोजमाप करून चाचणी करावी. राज्याबाहेरील अनधिकृत फटाक्यांना बंदी आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांमार्फत नियमांचे पालन करण्याबाबत कार्यवाही करावी. रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि निषिद्ध ठिकाणी फटाके फोडण्यास परवानगी नाही. सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोलिस विभागांनी याचे सक्तीने पालन करावे, असे मंडळाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com