नवी दिल्ली - गुवाहाटी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेतील (आयआयटी) संशोधकांनी सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर मिथेनॉल इंधनात करणारा प्रकाश-उत्प्रेरक पदार्थ विकसित केला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली..पर्यावरणाची अधिक हानी न पोहोचता वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्याच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी हे संशोधन केले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष ‘जर्नल ऑफ मटेरियल सायन्स या नियतकालिकात प्रकाशित झाले आहेत. ‘पेट्रोलियमआधारित इंधनांवरील अवलंबित्वामुळे कार्बन डायऑक्साइडचे सर्वांत जास्त उत्सर्जन होते..यामुळे पर्यावरणावर ताण येऊन जागतिक तापमानवाढीत भर पडते. यावर उपाय म्हणून कार्बन डायऑक्साइडचे स्वच्छ इंधनांमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रकाश-उत्प्रेरक पद्धती विकसित करण्यावर संशोधक काम करीत आहेत,’ असे आयआयटी गुवाहाटीच्या रासायनिक अभियांत्रिकी विभागातील प्राध्यापिका महुआ डे यांनी सांगितले..हे आव्हान पेलण्यासाठी तुलनेने स्वस्त, धातूविरहित आणि विषमुक्त असलेल्या ग्राफिटिक कार्बन नायट्राइडचा वापर जागतिक पातळीवर संशोधक करीत आहेत. मात्रा वेगाने होणारा ऊर्जाक्षय आणि इंधन निर्मितीचे प्रमाण कमी असण्याच्या मर्यादांमुळे अद्याप कोणताही ठोस व प्रभावी उपाय विकसित झालेला नाही..या त्रुटीवर उपाय म्हणून आयआयटी गुवाहाटीमधील संशोधकांच्या चमूने ग्राफिटिक कार्बन नायट्राईट आणि ग्राफीनच्या काही स्तरांचे मिश्रण केले. सध्याचे काम पर्यावरणीय समस्या कमी करण्यासाठी आणि त्याचबरोबर हरित ऊर्जेसाठी योगदान देण्यास हातभार लावेल, अशी अपेक्षा आहे. सौर ऊर्जेचा वापर करून कार्बन डायऑक्साइडचे हरित इंधनात रूपांतर करणे हे या दिशेने एक आशादायक तंत्रज्ञान आहे, असेही डे म्हणाल्या..संशोधकांच्या आमच्या चमूद्वारे विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग औष्णिक विद्युत प्रकल्प, सिमेंट उत्पादक केंद्रे, पोलाद उत्पादन केंद्रे आणि पेट्रोकेमिकल शुद्धीकरण प्रकल्प अशा उद्योगांमध्ये होऊ शकतो. यामुळे वर्तुळाकार कार्बनभोवतीच्या वर्तुळाकार अर्थव्यवस्थेकडे व भविष्यातील स्वच्छ ऊर्जेकडे जाण्यास प्रोत्साहन देईल.’’- महुआ डे, प्राध्यापिका, आयआयटी गुवाहाटी.संशोधनातील निष्कर्षग्राफीनच्या काही स्तरांमुळे दृश्यमान प्रकाश किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कार्बन नायट्राईडची प्रकाश-उत्प्रेरक ऊर्जा साठवण क्षमतेत सुधारणाउत्प्रेरक अधिक काळ सक्रिय राहिलाप्रकाश शोषणात वाढ होऊन विद्युतभार निर्मितीत सुधारणासंमिश्र पदार्थांमध्ये १५ वजन टक्के ग्राफीन असलेल्या उत्प्रेरकाने कार्बन डायऑक्साइडचे मिथेनॉलमध्ये सर्वाधिक कार्यक्षम रूपांतर केलेव्यावहारिक उपयोगांसाठी महत्त्वपूर्ण मानली जाणारी उच्च स्थिरताही या उत्प्रेरकात आढळून आली.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.