CM Yogi adityanath Inaugurates Ashok Leyland's Massive E-Bus Plant
sakal
उत्तर प्रदेशातील औद्योगिक प्रगतीला अधिक वेग देण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लखनौमध्ये 'अशोक लेलँड' कंपनीच्या भव्य इलेक्ट्रिक वाहन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन केले. याप्रसंगी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच.डी. कुमारस्वामी यांचीही प्रमुख उपस्थिती होती. या नव्या प्रकल्पामुळे उत्तर प्रदेश आता केवळ क्षमतांचा प्रदेश न राहता, त्या क्षमतांचे प्रत्यक्ष निकालात रूपांतर करणारा प्रदेश बनला आहे, असे गौरवपूर्ण उद्गार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काढले.